थोडे माझ्याविषयी

नमस्कार !

आपण सर्वाना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नूतन वर्ष 2020 आपणास आरोग्यदायी व भरभराट देणारे जावो.

मी, मिरज येथे ८ ऑक्टो. २०१४ रोजी विजयादशमीच्या दिवशी प्रॅक्टिस ला सुरुवात केली. या काळात आपण दिलेल्या सहकार्याबद्दल मी आभारी आहे व स्नेह असाच वृद्धिंगत होवो हि इच्छा.
 [paj-owl-slider]

हैदराबाद येथील सुप्रसिद्ध एशिअन इन्स्टीट्युट ऑफ गस्ट्रोइंटेरोलॉजी येथून साडेचार वर्षाचा अनुभव व  जठरांत्र शास्त्राक्रीयाशास्त्रात अतिविशेष पदवी घेतल्यानंतर येथे मी पाठक हॉस्पिटल येथे कार्यरत झालो. त्याबरोबर भारती हॉस्पिटल सांगली येथे देखील मी कार्यरत आहे.

मी पाठक हॉस्पिटल येथे जठरांत्रशास्त्र शस्त्रक्रियेसाठी वेगळा विभाग चालू केलेला असून त्यामध्ये खालील सुविधा उपलब्ध आहेत

  1. जठर , आतडे व लिवर व स्वादुपिंड यांच्या शस्त्रक्रिया
  2. गॅस्ट्रोस्कोपी : तोंडाद्वारे दुर्बिण सोडून पोटाची आतून तपासणी
  3. दुर्बिणीद्वारे होणार्या शस्त्रक्रिया ( लॅपरोस्कोपी )    
    • दुर्बिणीद्वारे पित्ताशय काढणे
    • दुर्बिणीद्वारे अपेंडिक्स काढणे
    • हायटस हर्निया रिपेर
    • संडासच्या जागेतून अंग बाहेर येत असेल तर ते दुरुस्त करणे
  4. सर्व प्रकारच्या जठर , आतडे, लिवर व स्वादुपिंड यांच्या कॅन्सर च्या शस्त्रक्रिया
  5. मूळव्याध, भगेंद्र, संडास च्या जागेच्या तक्रारी : कोलोप्रोक्टोलॉजि

मी भारती हॉस्पिटल येथे सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी या विभागाची ओ. पी. डी. दर गुरुवारी सकाळी ९ ते ११  पाहतो. तेथे सर्जरी विभागाच्या सहकार्यामुळे अनेक गरजू रुग्णांना गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया जसे लिवर, स्वादुपिंड यांच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रिया माफक दारात व सरकारी योजनांच्या मार्फत देखील केलेल्या आहेत. आपल्या शुभेच्छा व सहकार्य असेच राहू देत.
डॉ. सुधन्वा रामचंद्र पाठक
MS, DNB ( Surgical Gastro), FAIS, FIAGES