सन २०१४ पासून केंद्र शासनाने दत्तक प्रक्रिया अधिक पारदर्शी व पालकांना सोयीची करण्यासाठी CARA तर्फे ऑनलाईन पद्धतीने केली आहे त्यामुळे खालील दिलेली यादी केवळ थोडी माहिती असावी या हेतूने बनवलेली आहे. पालकांना सूचना आहे की त्यांनी कारा च्या वेबसाईट वर लॉग इन करावे तेथील यादीनुसार कागदपत्रांची पूर्तता करावी.
- दत्ताकेच्छु पालकांचे वयाचे दाखले, उदा. जन्म दाखला , शाळांत परीक्षा दाखला.
- विवाहाचा दाखला
- दत्ताकेच्छु पालकांचा एकत्र असलेला फोटो.
- नमुन्याप्रमाणे दोन्ही पालकांचा वैद्यकीय दाखला
- मूल होत नसलेस त्याबाबत वन्ध्यत्वतज्ञांचा किंवा स्त्रीरोग्ताज्ञांचा दाखला.
- मिळकतीचा दाखला —– salary sleep किंवा उत्पन्नाचा दाखला.
- प्राप्तीकराचा दाखला.
- उत्पन्नाची स्थिती दर्शवणारे bank statement, share certificate, LIC policy इत्यादि.
- दत्ताकेच्छु पालकांचे दोघांचे एकत्र दत्ताकाबाबत ना हरकत पत्र.
- पतीचे दत्ताकासाठी पत्नीस संमतीपत्र.
- पत्नीचे पतीस दत्ताकासाठी संमतीपत्र.
- दत्ताकेच्छू जोडप्याच्या आईवडिलांचे ना हरकत पत्र.
- दोन्ही पालक जर नोकरीत असतील तर पाल्यासाठी केलेली व्यवस्था हमीपत्रावर कळवणे.
- दत्ताकेच्छु जोडप्याशिवाय वयाने लहान असणाऱ्या नातेवाईकांचे नोटरी केलेले हमीपत्र की जोडप्याच्या पश्यात आम्ही पाल्यास सांभाळू व आमची दत्ताकास हरकत नाही.
- नजीकच्या पोलीस ठाण्याकडून चांगल्या वर्तणुकीचा दाखला.
- गृहभेट चौकशी आहवाल
- पाल्याची प्रगती नियमित पणे कळवू असे हमीपत्र.
- दत्ताकेच्छू पतीपत्नीचे एकूण वय ८५ वर्षे पेक्षा कमी भरले पाहिजे.
- दत्ताकेच्छु पतीपत्नीचे एकूण मासिक उत्पन्न रु.४०००० चे पेक्षा अधिक हवे.