लोकनेते कै. डॉ. एन. आर. पाठक  स्मृती व्याख्यान २०२५ 

दर वर्षी ३० नोव्हेंबर दिवशी , पाठक ट्रस्ट व पाठक परिवार तर्फे कै. डॉ. एन. आर. पाठक यांचे स्मृतिदिना निमित्त व्याख्यान आयोजित करण्यात येते.

१९८६ साली या उपक्रमाची सुरुवात झाली.

सुरवातीच्या काही वर्षांत भाषणे मुख्यत्वे डॉक्टरांच्या सामाजिक व राजकीय जीवनातील सहकाऱ्यांची असत. त्यात मुख्यत्वे त्यांचा जीवनप्रवास व त्यांचा वक्त्यावर व तत्कालीन समाजावर झालेला परिणाम तसेच त्यांच्या इतर हृद्य आठवणी यांची उजळणी होई.

१९९० साली ह्याच दिवशी ट्रस्ट तर्फे वृद्धाश्रमाची स्थापना झाली. त्याचे उद्घटनाचे वेळी लोकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामुळे त्या सालापासून लोकोपयोगी विषय देखील मांडावेत अशी कल्पना बळ धरू लागली. १९९७ पर्यंत हा कार्यक्रम वृद्धाश्रमाचा प्रांगणात होत असे, पण मिळणाऱ्या अधिक प्रतिसादास जागा अपुरी होऊ लागली. म्हणून १९९८ सालापासून आजतागायत हा कार्यक्रम खरे मंदिर च्या मुक्तांगण सभागृहात होतो.

जशी वर्षे उलटली तसे तसे ह्या व्याख्यानातील विषयांचे वैविध्य वाढत गेले. अध्यात्मिक, वैचारिक, सामाजिक, वैज्ञानिक तर कधी कधी ललित असे वेगवेगळे विषय वक्त्यांकडून हाताळले गेले. पण यामागील एक सूत्र कायम राहिले की होणारे भाषण हे लोकोपयोगी व सर्वसमावेशक असावे. त्यामुळे या व्याख्यानास नेहमीच श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत राहिला आहे.

यावर्षी सांगली येथील सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन हे आम्हास यावर्षी व्याख्याते म्हणून लाभले आहेत. डॉ. दिलीप पटवर्धन स्वतः एक निष्णात सर्जन आहेतच, पण त्याबरोबर जीवन विद्या मिशन, रोटरी क्लब यांच्या माध्यमातून ते सदैव समाजकार्यात अग्रेसर असतात. ते एक उत्कृष्ट वक्ते आहेत, अनेक ठिकाणी त्यांची व्याख्याने होतात. ते लेखक देखील असून, त्यांचे यूट्यूब चॅनल देखील प्रसिद्ध आहे. नुकतेच पुण्यातील प्रसिद्ध वसंत व्याख्यानमालेत त्यांचे भाषण गाजले होते. वर्क लाईफ बॅलन्स या विषयावर त्यांचे प्रभुत्व आहे

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आम्हास श्री. शहाजीराव जगदाळे, संस्थापक श्रीम इंडस्ट्रीज हे लाभलेले आहेत. ते स्वतः नावाजलेले उद्योजक तसेच एक तज्ज्ञ इंजिनियर आहेत. सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.


तरी आपणांस नम्र विनंती की आपण यावर्षीच्या व्याख्यानास आवर्जून यावे. या कार्यक्रमात पाठक ट्रस्टचा वार्षिक अहवाल देखील माननीय अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशित होईल.

हे व्याख्यान आता youtube वर उपलब्ध आहे .

2 thoughts on “लोकनेते कै. डॉ. एन. आर. पाठक  स्मृती व्याख्यान २०२५ ”

  1. डॉक्टर दिलीप पटवर्धन

    खूपच रथी महारथी येऊन गेलेले दिसत आहेत आपण मला या खेपेस बोलावून माझा मानवाढविला त्याबद्दल खूपच कृतज्ञता. माझ्या कडून चांगले विचार मांडण्याचा मी अवश्य प्रयत्न करेन धन्यवाद

  2. Dr Shrikant Kulkarni

    आपण खूप … म्हणजे खूपच मोठ्ठ्या ( खरोखर मोठ्या) माणसांच्या यादीत जाऊन बसलात , याचा खरेच आनंद झाला..
    मुकुंद पाठक हा माझा classmate , hostel mate व जवळचा मित्र आहे.आपण त्यांच्या वडिलांच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून जाणे , हा दुग्धशर्करा योग आहे…
    मी वैयक्तिक कारणाने येऊ शकलो नाही , पण आम्ही नेहमीच अभिमानाने सांगतो , ” ते आमचे खास मित्र आहेत “.
    सौरभचे जागतिक पातळीवरचे यश पाहून तर थक्क व्हायला होतंय…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top