पुष्कळ लोकांना सेवाभवी संस्थाना मदत करावी वाटते, त्यांना संस्थेस काय अपेक्षा आहेत हे कळावे ह्या उद्देशाने काही नम्र सूचना.
१. अर्थ साहाय्य – देणगी स्वरूपात. आमच्या संस्थेला दिलेल्या देणग्यांना 80G कलमानुसार आयकरात सूट मिळते.
२. शालेय व इतर पुस्तके, मासिके, खेळाचे साहित्य, शाळेस लागणाऱ्या वस्तू देवून.
३. मुलांना दत्तक घेऊन तुम्ही त्यांस हक्काचे घर व आई वडिलांचे प्रेम मिळवून देउ शकता.
४. संस्थेच्या इमारत निधीस मदत करा.
५.संस्थेत आश्रित मुला-मुलींच्या लग्नास मदत करणे. त्यांस सुयोग्य स्थळ शोधून देणे.
६. संस्थेत वाढलेल्या मुलांना ते जेव्हा स्वतंत्र होतात तेंव्हा स्वतःच्या पायावर उभे राहण्यास त्यांना मदत करा. त्यांना व्यवसाय संधी उपलब्ध करून द्या.
७.आपल्या हयात नसलेल्या प्रियजनांच्या स्मृती प्रीत्यर्थ कायम ठेव योजनेत देणगी देवून त्याच्या व्याजातून मिळणाऱ्या रकमेचा विनियोग आपल्या इच्छेनुरूप मुलांना गोड जेवण, शालेय गणवेश, पुस्तके, वृद्धाश्रमातील ग्रंथालयास पुस्तके अश्या एखाद्या कारणासाठी संस्था करेल.
८. मुलांसाठी computer courses, vocational training sponsor करा.
९. स्वतः मदत करा व इतरांना मदत करणेस प्रोत्साहन द्या.
Leave a Reply