वाई दि. १८ : येथे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कन्या शाळा वाई च्या माजी विद्यार्थिनी संघातर्फे सामाजिक कार्यासाठी देण्यात येणार धोंडो केशव कर्वे पुरस्कार आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉ. रा. न. पाठक यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या व्हाईस चेअरपर्सन विद्याताई कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी कन्याशाळेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष ऍड. प्रभाकर सोनपाटकी , शाळेच्या मुख्याध्यापिका व माजी विद्यार्थिनी संघाच्या उपाध्यक्षा व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. पाठक यांना पुरस्कारासोबत मानपत्र व शाल श्रीफळ देखील प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास आपल्या संस्थेच्या ट्रस्टी डॉ. सौ. अंजली रा. पाठक या देखील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे पूर्वी कै. धोंडो केशव कर्वे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे जयंती निमित्त पूजन करण्यात आले. तसेच स्टेजवर कै. धोंडो केशव कर्वे व बाया कर्वे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थितांमध्ये पाठक अनाथाश्रमाच्या माजी प्रवेशित मुला मुलींचा देखील सहभाग होता. डॉ. पाठक यांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या आई वडिलांचे तसेच कुटुंबीय व सहकाऱ्यांच्या प्रोत्साहनामुळेच हे कार्य करता आले ये नमूद केले तसेच कै. धोंडो केशव कर्वे यांच्या चरित्रातून काय शिकावयास मिळते हे पण सांगितलेले.
Leave a Reply