दर वर्षी ३० नोव्हेंबर दिवशी , पाठक ट्रस्ट व पाठक परिवार तर्फे कै. डॉ. न. रा. पाठक यांचे स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यान आयोजित करण्यात येते.
१९८६ साली या उपक्रमाची सुरुवात झाली.
सुरवातीच्या काही वर्षांत भाषणे मुख्यत्वे डॉक्टरांच्या सामाजिक व राजकीय जीवनातील सहकाऱ्यांची असत. त्यात मुख्यत्वे त्यांचा जीवनप्रवास व त्यांचा वक्त्यावर व तत्कालीन समाजावर झालेला परिणाम तसेच त्यांच्या इतर हृद्य आठवणी यांची उजळणी होई.
१९९० साली ह्याच दिवशी ट्रस्ट तर्फे वृद्धाश्रमाची स्थापना झाली. त्याचे उद्घटनाचे वेळी लोकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामुळे त्या सालापासून लोकोपयोगी विषय देखील मांडावेत अशी कल्पना बळ धरू लागली. १९९७ पर्यंत हा कार्यक्रम वृद्धाश्रमाचा प्रांगणात होत असे, पण मिळणाऱ्या अधिक प्रतिसादास जागा अपुरी होऊ लागली. म्हणून १९९८ सालापासून आजतागायत हा कार्यक्रम खरे मंदिर च्या मुक्तांगण सभागृहात होतो.
जशी वर्षे उलटली तसे तसे ह्या व्याख्यानातील विषयांचे वैविध्य वाढत गेले. अध्यात्मिक, वैचारिक, सामाजिक, वैज्ञानिक तर कधी कधी ललित असे वेगवेगळे विषय वक्त्यांकडून हाताळले गेले. पण यामागील एक सूत्र कायम राहिले की होणारे भाषण हे लोकोपयोगी व सर्वसमावेशक असावे. त्यामुळे या व्याख्यानास नेहमीच श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत राहिला आहे.
२०२० व २०२१ साली साथरोग निर्बंध होते व त्याहून महत्त्वाचे म्हणजे, अशा काळात सामाजिक कार्यक्रम घेणे, खुद्द डॉक्टरांना आवडले नसते त्यामुळे संस्थेने हा सार्वजनिक कार्यक्रम घेणे कटाक्षाने टाळले. २ ० २ २ रोजी डॉ . प्रिया प्रभू यांच्या व्याख्यानाने या उपक्रमास पुन्हा सुरुवात झालेली आहे . गेल्या वर्षी २ ० २ ३ मध्ये डॉ . सुधीर राशिंगकर यांचे व्याख्यान झाले .
ह्या वर्षी पुणे येथील जडण घडण या युवा मासिकाचे संपादक , तसेच लेखक व प्रसिद्ध वक्ते डॉ . सागर देशपांडे आम्हास वक्ते म्हणून लाभले आहेत .
खालील तक्त्यात वर्ष व वक्ते यांची यादी आहे. जेवढी व्याख्याने ध्वनिमुद्रित असतील तेवढी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे.
साल | वक्ते |
१९८६ | श्री. सा. रे. पाटील, आमदार |
१९८७ | दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार |
१९८८ | श्री. शंकरराव गाडवे, मिरजेचे माजी नगराध्यक्ष |
१९८९ | श्री. युसूफ मुल्ला, डॉक्टरांचे कार्यकर्ते व प्रचारक |
१९९० | श्री. अनंत दीक्षित |
१९९१ | श्री. कि. रा. घोरपडे |
१९९२ | श्री. वसंतराव आगाशे |
१९९३ | श्री. डी. टी. (बाळासाहेब) चिवटे, माजी नगराध्यक्ष |
१९९४ | श्री. श्रीधर पळसुले |
१९९५ | श्री. सुनिलकुमार लवटे |
१९९६ | श्री. वासुदेव कुलकर्णी |
१९९७ | प्रा. वैजनथ महाजन |
१९९८ | प्रा. शिवाजीराव भोसले |
१९९९ | प्रा. निर्मलकुमार फडकुले |
२००० | प्रा. डॉ. यशवंत पाठक |
२००१ | श्री विवेक घळसासी |
२००२ | सद्गुरू गुरुनाथ मुंगळे |
२००३ | प्रा. डॉ. एस. एन. नवलगुंदकर |
२००४ | मा. कुमुद गोसावी |
२००५ | डॉ. कुमार सप्तर्षी |
२००६ | डॉ. अनिल अवचट |
२००७ | मा. कविता महाजन |
२००८ | डॉ. आनंद कर्वे |
२००९ | श्री. विश्वास मेहेंदळे |
२०१० | श्री. प्रवीण दवणे |
२०११ | प्रा. डॉ. यशवंत पाठक |
२०१२ | श्री. अच्युत गोडबोले |
२०१३ | मा. तारा भवाळकर |
२०१४ | श्री. निळू दामले |
२०१५ | श्री. अभय भंडारी |
२०१६ | श्री. इंद्रजित देशमुख |
२०१७ | प्रा. मिलिंद जोशी |
२०१८ | भागवताचार्य वा. ना. उत्पात |
२०१९ | डॉ. संजय उपाध्ये |
२०२० | साथरोग प्रतिबंध असलेने व्याख्यान नाही |
२०२१ | साथरोग प्रतिबंध असलेने व्याख्यान नाही |
२०२२ | डॉ प्रिया प्रभू देशपांडे |
२०२३ | डॉ . सुधीर राशिंगकर |
Leave a Reply