डॉ. न. रा. पाठक स्मृती व्याख्यान

दर वर्षी ३० नोव्हेंबर दिवशी , पाठक ट्रस्ट व पाठक परिवार तर्फे कै. डॉ. न. रा. पाठक यांचे स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यान आयोजित करण्यात येते.
१९८६ साली या उपक्रमाची सुरुवात झाली.

सुरवातीच्या काही वर्षांत भाषणे मुख्यत्वे डॉक्टरांच्या सामाजिक व राजकीय जीवनातील सहकाऱ्यांची असत. त्यात मुख्यत्वे त्यांचा जीवनप्रवास व त्यांचा वक्त्यावर व तत्कालीन समाजावर झालेला परिणाम तसेच त्यांच्या इतर हृद्य आठवणी यांची उजळणी होई.

१९९० साली ह्याच दिवशी ट्रस्ट तर्फे वृद्धाश्रमाची स्थापना झाली. त्याचे उद्घटनाचे वेळी लोकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामुळे त्या सालापासून लोकोपयोगी विषय देखील मांडावेत अशी कल्पना बळ धरू लागली. १९९७ पर्यंत हा कार्यक्रम वृद्धाश्रमाचा प्रांगणात होत असे, पण मिळणाऱ्या अधिक प्रतिसादास जागा अपुरी होऊ लागली. म्हणून १९९८ सालापासून आजतागायत हा कार्यक्रम खरे मंदिर च्या मुक्तांगण सभागृहात होतो.

जशी वर्षे उलटली तसे तसे ह्या व्याख्यानातील विषयांचे वैविध्य वाढत गेले. अध्यात्मिक, वैचारिक, सामाजिक, वैज्ञानिक तर कधी कधी ललित असे वेगवेगळे विषय वक्त्यांकडून हाताळले गेले. पण यामागील एक सूत्र कायम राहिले की होणारे भाषण हे लोकोपयोगी व सर्वसमावेशक असावे. त्यामुळे या व्याख्यानास नेहमीच श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत राहिला आहे.

२०२० व २०२१ साली साथरोग निर्बंध होते व त्याहून महत्त्वाचे म्हणजे, अशा काळात सामाजिक कार्यक्रम घेणे, खुद्द डॉक्टरांना आवडले नसते त्यामुळे संस्थेने हा सार्वजनिक कार्यक्रम घेणे कटाक्षाने टाळले.

या वर्षी साथरोगाचे मळभ दूर झाले आहे, पण त्याच वेळी त्याचे चटके आपल्यापैकी बऱ्याच जणांना बसले आहेत. अशी परिस्थिती परत कधी न येवो हीच देवाकडे प्रार्थना. त्यामुळे या वर्षी या खंडित मालिकेचा पुन्हा श्री गणेशा करताना “भविष्यातील साथीचे रोग व प्रतिबंधात्मक उपाययोजना” या विषयावरील डॉ. प्रिया प्रभू देशपांडे यांच्या व्याख्यानाने करत आहोत व त्याचा आम्हास आनंद होत आहे.

खालील तक्त्यात वर्ष व वक्ते यांची यादी आहे. जेवढी व्याख्याने ध्वनिमुद्रित असतील तेवढी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे.

सालवक्ते
१९८६श्री. सा. रे. पाटील, आमदार
१९८७दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार
१९८८श्री. शंकरराव गाडवे, मिरजेचे माजी नगराध्यक्ष
१९८९श्री. युसूफ मुल्ला, डॉक्टरांचे कार्यकर्ते व प्रचारक
१९९०श्री. अनंत दीक्षित
१९९१श्री. कि. रा. घोरपडे
१९९२श्री. वसंतराव आगाशे
१९९३श्री. डी. टी. (बाळासाहेब) चिवटे, माजी नगराध्यक्ष
१९९४श्री. श्रीधर पळसुले
१९९५श्री. सुनिलकुमार लवटे
१९९६श्री. वासुदेव कुलकर्णी
१९९७प्रा. वैजनथ महाजन
१९९८प्रा. शिवाजीराव भोसले
१९९९प्रा. निर्मलकुमार फडकुले
२०००प्रा. डॉ. यशवंत पाठक
२००१श्री विवेक घळसासी
२००२सद्गुरू  गुरुनाथ मुंगळे
२००३प्रा. डॉ. एस. एन. नवलगुंदकर
२००४मा. कुमुद गोसावी
२००५डॉ. कुमार सप्तर्षी
२००६डॉ. अनिल अवचट
२००७मा. कविता महाजन
२००८डॉ. आनंद कर्वे
२००९श्री. विश्वास मेहेंदळे
२०१०श्री. प्रवीण दवणे
२०११प्रा. डॉ. यशवंत पाठक
२०१२श्री. अच्युत गोडबोले
२०१३मा. तारा भवाळकर
२०१४श्री. निळू दामले
२०१५श्री. अभय भंडारी
२०१६श्री. इंद्रजित देशमुख
२०१७प्रा. मिलिंद जोशी
२०१८भागवताचार्य वा. ना. उत्पात
२०१९डॉ. संजय उपाध्ये
२०२०साथरोग प्रतिबंध असलेने व्याख्यान नाही
२०२१साथरोग प्रतिबंध असलेने व्याख्यान नाही
२०२२डॉ प्रिया प्रभू देशपांडे
Posted in Trust Events

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*