दि . ४ ऑगस्ट २०२६ रोजी ज्येष्ठ शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल व नेते पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना देवाज्ञा झाली.
डॉ. डी. वाय. पाटील यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य उत्तुंग होते. तसेच पाठक ट्रस्ट व हॉस्पिटल या संस्थांचे संस्थापक कै. डॉ. एन. आर. पाठक यांचे जवळचे मित्र होते. पक्षीय चौकट आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन मानवकल्याण, लोकसेवा आणि मैत्रीच्या मूल्यांवर आधारलेले त्यांचे हे नाते आम्हास आदर्शवत आहे. त्यांनी खासगी शिक्षणशिक्षण संस्थांचे समृद्ध विश्व निर्मिले, ज्यामुळे अनेक विद्यार्थी विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेऊन आयुष्यात खूप मोठी प्रगती साधू शकले.
पाठक ट्रस्टचे सर्व ट्रस्टी , सल्लागार मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांच्यातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

