पाठक ट्रस्ट, मिरज संचलित ६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या बालगृहाच्या व्यवस्थापन व देखरेखीसाठी अधीक्षक पदाची (१ जागा) भरती करण्यात येत आहे. समाजकार्याची आवड असलेल्या, जबाबदारीने काम करणाऱ्या आणि मुलांच्या संगोपन व कल्याणासाठी योगदान देण्याची इच्छा असलेल्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक पात्रता व अटी
- शैक्षणिक पात्रता: मास्टर ऑफ सोशल वर्क (MSW).
- भाषा ज्ञान: मराठी भाषेवर प्रभुत्व, विशेषतः शासकीय व कार्यालयीन पत्रव्यवहारासाठी; तसेच इंग्रजी पत्रव्यवहार व संभाषणाचे कौशल्य.
- संगणकीय ज्ञान: MS Office — Word, PowerPoint आणि Excel.
- कामाची पद्धत: जबाबदारीने, मेहनतीने आणि समन्वयाने काम करण्याची तयारी.
- कामाचे स्वरूप: गरजेनुसार क्वचित प्रसंगी अनियमित वेळेत काम करणे व इतर शहरांमध्ये प्रवास करण्याची तयारी.
- प्राधान्य: ४५ वर्षांखालील पुरुष उमेदवारांना प्राधान्य.
- महत्त्वाची अट: उमेदवार दारू व तंबाखूचे सेवन न करणारा असावा.
अर्ज कसा करावा?
इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील Google Form भरून आपली माहिती नोंदवावी आणि त्यासोबत आपला Resume / बायोडाटा अपलोड करावा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्याची अंतिम मुदत: ३१ ऑक्टोबर २०२६
