मा. पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांची पाठक ट्रस्टच्या नूतन वास्तूस सदिच्छा भेट

मिरज दि. १५ ऑगस्ट २०२६

पाठक ट्रस्टच्या नूतन इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच या वास्तूचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री सांगली जिल्हा मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी या नूतन संकुलाला सदिच्छा भेट देऊन पाहणी केली.

पाठक ट्रस्टतर्फे चालवल्या जाणाऱ्या शिशुगृह-बालगृह आणि वृद्धाश्रम या दोन्ही इमारतींच्या आधुनिक सुविधांची पाहणी त्यांनी या वेळी केली.

या प्रसंगी श्री. मकरंद देशपांडे, श्री. दीपक शिंदे, श्री. संदीप आवटी, सौ. अपर्णा विवेक शेटे, श्री. मोहन वाटवे, श्री. विवेक शेटे, डॉ. विनायक साठे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे ट्रस्टी, सल्लागार, कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते हे देखील या प्रसंगी उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थित ट्रस्टी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी संस्थेच्या प्रदीर्घ सामाजिक कार्याचा गौरव केला. संस्थेचे माजी अध्यक्ष कै. श्री. श्री. पळसुले यांची देखील आठवण या प्रसंगी मंत्रिमहोदयांनी काढली. तसेच त्यांनी काही मौल्यवान सूचना, मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.

मंत्रिमहोदयांच्या या भेटीबद्दल आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल पाठक ट्रस्टच्या विश्वस्तांनी व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

वास्तूचे अखेरचे काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच अधिकृत उद्घाटन सोहळ्याची तारीख जाहीर केली जाईल. या नवीन इमारतीमुळे बालकांना व ज्येष्ठ नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top