आज तीस सप्टेंबर म्हणजे आमच्या संस्थेचे संस्थापक कै. डॉ. न. रा. पाठक यांचा जन्मदिवस. नेहमीप्रमाणे त्यांच्या मिरज मार्केट जवळील असलेल्या पुतळ्याचे वंदन करून साजरा करण्यात आल. त्यास संस्थेचे ट्रस्टी, संचालक, कर्मचारी व प्रवेशित मुले व आजी आजोबा यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच समाजातील व राजकीय क्षेत्रातील काही मान्यवर देखील उपस्थित होते.
डॉक्टरांच्या शताब्दी निमित्ताने काही साहित्य परत संशोधित करण्यात आले होते. त्यावेळी आम्हास त्यांची १९४० साली, जेव्हा वयाच्या फक्त २५ व्या वर्षी ते मेडिकल स्कूल च्या शेवटच्या वर्षात शिकत होते तेव्हाची, डायरी सापडली. त्या डायरीत दि. ३०-१२-४० रोजी त्यांनी त्यांच्या मनात अनाथाश्रम चालू करण्याची कल्पना त्यांनी व्यक्त केली आहे. एवढ्या वयात एखादे अवघड आव्हान आपले ध्येय म्हणून ठरवणे व त्यासाठी प्रयत्न करून करवून दाखवणे यासाठी अथक परिश्रम व त्याग त्यांनी केला. १९४८ साली आश्रमाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली, १९६९ पर्यंत डॉक्टरांनी तो स्वखर्चाने कोणत्याही मदतीशिवाय चालवला. १९६९ साली पाठक ट्रस्ट स्थापन केला व १९८४ मध्ये ट्रस्टची स्वतःची वास्तू उभी राहिली. अनाथाश्रामामुळे १०० पेक्षाही जास्त मुलांना आतापर्यंत लाभ झाला आहे.
ज्या वयात माणसाला करियर, पैसे कमावणे, आयुष्यात ‘सेटल’ होणे अशी स्वप्ने पडतात त्या वयात त्यांनी आपण आपल्या समाजासाठी काही तरी करावे असे वाटणे हे त्यांच्या डायरीतले पान दाखवते व ते त्यांच्या उदात्त विचारसरणीचे द्योतक आहे. “If you can dream it, you can do it!” हे Walt Disney चे वाक्य त्यांनी प्रत्यक्षात उतरून दाखवले.
Leave a Reply